सदाभाऊ खोत यांना पंतप्रधान करा, कुणी केली राष्ट्रपतींकडे मागणी?

| Updated on: May 22, 2023 | 6:19 AM

VIDEO | 500 आणि 100 च्या नोटा चलनातून बंद करण्याच्या सदाभाऊ खोत यांच्या मागणीवर राष्ट्रवादीच्या नेत्याचा हल्लाबोल?

Follow us on

अकोला : राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विटकरून उद्धव ठाकरे यांना इशारा दिल्याचे पाहायला मिळत आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना एक विनंती की अजित पवार यांच्यावर, पक्षावर आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनवर जर तुमचे वक्ते बोलण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही सुद्धा तितक्याच ताकदीने बोलू. त्याचे परिणाम काहीही झाले तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. म्हणून आमची विनंती आहे, की अश्या लोकांना आवरा. कारण तोंड आम्हाला पण आहे. आम्ही तुमचा आणि मातोश्रीचा आदर करतो. जर अशा लोकांमुळे पक्ष बदनाम होत असेल तर कृपया आवर घालावा, असा इशारा अमोल मिटकरी यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना दिला आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी पाचशे आणि शंभर रूपयांच्या नोटा देखील चलनातून बाद करावा, अशी विनंती भारत सरकारला केली. यावर मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. मिटकरी यांनी खोचक टोला लगावत राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी विनंती केली की सदाभाऊ खोत यांना लवकरात लवकर प्रधानमंत्री करा. जसं पंतप्रधान मोदी यांनी २ हजारची नोट बंद केली तसं सदाभाऊ या नोटा बंद करतील. मंत्रिमंडळ पदासाठी ते भाजपमध्ये जाणार असल्याचे मनसुबे दिसताय. सदाभाऊ खोत यांनी दाबल्या का २ हजाराच्या नोटा असा टोला लगावत खोचकी टीकाही केल्याचे पाहायला मिळाले.