Ajit Pawar Video : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया; सवाल करताच म्हणाले, ‘उगीच काही…’

Ajit Pawar Video : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया; सवाल करताच म्हणाले, ‘उगीच काही…’

| Updated on: Mar 04, 2025 | 11:11 AM

धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया...

धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. यानंतर हा राजीनामा स्वीकारल्याची माहिती देखील मिळतेय. काल रात्री देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक झाली. यावेळी आधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा झाली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तिथे हजर झाले आणि यावेळीच धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिलेत आणि हा राजीनामा आज झाला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अजित पवार यांनी अधिकचं भाष्य करणं टाळलंय.’तुम्हाला काहीच माहिती नाही.. उगीच काही प्रश्न मला विचारू नका… मी विधानभवनात चाललोय… तिथे गेल्यावर सांगतो काय ते…’, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. विधानभवनात जाण्यापूर्वी आणि धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सूपर्द केल्यावर अजित पवार यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भात सवाल केला असता अजित पवार यांच्या चेहऱ्यावर नेहमी सारखे भाव दिसत नव्हते आणि अजित पवार पत्रकारांवरच काहीसे चिडल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Mar 04, 2025 11:11 AM