Dhananjay Munde Tweet : ‘… म्हणून मी राजीनामा दिला’, राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या पहिल्या टि्वटची चर्चा

Dhananjay Munde Tweet : ‘… म्हणून मी राजीनामा दिला’, राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या पहिल्या टि्वटची चर्चा

| Updated on: Mar 04, 2025 | 12:01 PM

अखेर 82 दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर आपल्या राजीनाम्यानंतर त्यांनी पहिलं टि्वट केल्याचे समोर आले आहे.

धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर आपल्या राजीनाम्यानंतर त्यांनी पहिलं टि्वट केल्याचे समोर आले आहे. ‘बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले’, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. तर पुढे त्यांनी ट्विटमध्ये असेही म्हटले, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अखेर 82 दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. काल रात्री देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक झाली. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Published on: Mar 04, 2025 11:59 AM