जितेंद्र आव्हाड पुन्हा एकनाथ शिंदेंच्या भेटीला, राज्यात काय घडतंय?

| Updated on: Sep 23, 2022 | 12:32 PM

मंत्रिपद न मिळाल्याने संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र आव्हाड, शिरसाट आणि शिंदे या त्रिकुटाच्या भेटीत नेमकं काय शिजतंय, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.

Follow us on

गिरीश गायकवाड,  मुंबईः राज्याच्या राजकारणात मागील दोन महिन्यांपासून मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. त्याच मालिकेत आणखी एक घटना समोर आली आहे. महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रबळ नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीला पोहोचले आहे. जितेंद्र आव्हाडांची गेल्या काही दिवसातली जवळपास चौथी ते पाचवी मुख्यमंत्री भेट असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. मात्र या भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ही भेट होत आहे. विशेष म्हणजे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हेदेखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेत. मंत्रिपद न मिळाल्याने संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र आव्हाड, शिरसाट आणि शिंदे या त्रिकुटाच्या भेटीत नेमकं काय शिजतंय, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.