Jitendra Awhad : कुठला पत्ता कुठे, कसा हलवला व्यवस्थित बघा… आव्हाडांकडून आणखी VIDEO ट्वीट
राज्यात शेतकरी संकटात असताना कृषीमंत्री ऑनलाईन जुगार खेळत आहेत, अशी टीका विरोधकांकडून केली जात असताना कोकाटे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. मात्र कोकाटे यांनी मी जुगार खेळत नव्हतो, असा दावा केलेला आहे.
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सभागृहातले आणखी दोन व्हिडिओ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले आहे. प्रश्नोत्तरांचा तास सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे जंगली रमी खेळत होते, आणखी किती पुरावे हवेत ते सांगा मागाल तेवढे पुरावे देतो, असे म्हणत जितेंद्र आव्हाडांनी हा व्हिडिओ ट्वीट केला. कोकाटेंनी पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते जाहिरात बघत होते असं सांगितलं होतं यावर टीका करत जितेंद्र आव्हाडांनी कोकाटे यांचे आणखी व्हिडिओ ट्वीट केले. त्यामुळे सर्व स्तरावरून झालेल्या टीकेनंतर आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार असल्याची चिन्हे पाहायला मिळत आहे. तसेच, कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे या व्हिडीओत दिसेल. माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे; प्रश्नौत्तरांचा तास सुरू आहे अन् दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, माणिकराव कोकाटे यांच्या पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते जाहिरात बघत होते असे सांगण्यात येत होते.
आता मी… pic.twitter.com/paHlQjGWP2— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 21, 2025
