Ravindra Dhangekar Video : भगवं मफलर अन् भगव्या टोपीत रवींद्र धंगेकर, ‘धनुष्यबाण’ हाती घेण्याआधी दादांच्या राष्ट्रवादीची ऑफर…

Ravindra Dhangekar Video : भगवं मफलर अन् भगव्या टोपीत रवींद्र धंगेकर, ‘धनुष्यबाण’ हाती घेण्याआधी दादांच्या राष्ट्रवादीची ऑफर…

| Updated on: Feb 25, 2025 | 10:20 AM

काँग्रेसचे रवींद्र धंगेकरांनी लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा अधिकृत निर्णय घोषित करू शकतात. त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली पण त्याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून धंगेकरांना ऑफर देण्यात आली.

काँग्रेसचे माजी आमदार आणि पुण्यातील डॅशिंग नेते अशी ओळख असलेले रवींद्र धंगेकर हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार हे जवळपास निश्चित आहे. पण त्याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील धंगेकरांना ऑफर दिली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार करावा असं म्हणत निमंत्रणचं दिलंय. ‘रवी भाऊ आपण हाडाचे कार्यकर्ते, सक्षम लोकप्रतिनिधी आहात. निवडणुकीत हर-जीत चालतच असते. नेतृत्व, कामाची पद्धत थांबत नाही. भाऊ तुझ्या सोबत काम केलं आहेच. काही दिवस बातमी येत आहे. दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहात. कार्यकर्त्यांची मीटिंग घेणार आहात, कुठे प्रवेश करायचा या संदर्भात चर्चा विचार विनिमय करणार आहात. रवी भाऊ अजित दादांचे आणि तुझे संबंध नेहमीच चांगले आहेत ते तू अनुभवलं आहे. तुझ्यासारखे काम करणारा, सक्षम सर्वांना एकत्रित घेऊन काम करणारा हाडाचा कार्यकर्ता लोकप्रतिनिधी नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार करावा अशी कार्यकर्ता बहीण म्हणून विनंती असेल’, असं रूपाली ठोंबरे पाटील म्हणाल्यात. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने धंगेकरांना ऑफर दिली असली तरी धंगेकरांनी आधीच भगवं स्टेटस ठेवून सूचक इशारा दिलाय आणि धंगेकरांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहे. त्यासाठी एक बैठक देखील धंगेकरांनी आयोजित केली आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर खरं काँग्रेसला राम राम ठोकणार का? आणि काँग्रेस पक्ष सोडला तर कोणाची साथ पुढे देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Published on: Feb 25, 2025 10:20 AM