Eknath Shinde : आपण वयाची सेंच्युरी…. एकनाथ शिंदे यांचा थेट शरद पवार यांना फोन अन् दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

| Updated on: Dec 12, 2025 | 12:52 PM

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता, जिथे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या राजकीय शुभेच्छांच्या दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या चर्चेनंतर, भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन तास बैठक घेतली. या बैठकीत मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढवण्याचा निर्णय १००% झाल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. पालिका निवडणुकांमध्ये महायुतीला विजय मिळवून मुंबई आणि ठाणे शहरांमध्ये महायुतीचा महापौर करण्याचे ध्येय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Dec 12, 2025 12:52 PM