Sharad Pawar : ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवारांचा जाहीर पाठिंबा, पत्राद्वारे स्पष्ट म्हटलं एकदिलाने…
'हिंदी सक्तीचा विरोध करण्यासाठी येत्या शनिवार, दि. 5 जुलै २०२५ रोजी तामाम मराठीजनांकडून मुंबईत एक मोठा मोर्चा पुकारण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा या आंदोलनास संपूर्ण पाठिंबा आहे.'
हिंदी सक्ती विरोधाच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधुंकडून येत्या ५ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे बंधूंकडून एकत्रितपणे काढण्यात येणाऱ्या मोर्चाला आता शरद पवार यांच्याकडून जाहीरपणे पाठिंबा देण्यात आला आहे. या मोर्चामध्ये शरद पवार यांचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय. ‘महाराष्ट्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP २०२०)’ अंतर्गत प्राथमिक शिक्षणात त्रिभाषा सूत्रान्वये केल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी, आणि प्राथमिक शिक्षण प्रामुख्याने मातृभाषेतूनच व्हावे ह्या मागणीसाठी येत्या शनिवारी, ५ जुलै २०२५ रोजी तमाम मराठीजनांकडून मुंबईत पुकारण्यात आलेल्या मोर्चाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचा जाहीर पाठिंबा… सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊयात !’, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सांगण्यात आलंय.
महाराष्ट्र सरकारच्या 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP २०२०)' अंतर्गत प्राथमिक शिक्षणात त्रिभाषा सूत्रान्वये केल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी, आणि प्राथमिक शिक्षण प्रामुख्याने मातृभाषेतूनच व्हावे ह्या मागणीसाठी येत्या शनिवारी, ५ जुलै २०२५ रोजी तमाम मराठीजनांकडून… pic.twitter.com/5ebMm3LxQ8
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 27, 2025
