Kirit Somaiya यांच्या सुरक्षेत CISF जवान कमी पडले : Jayant Patil

Kirit Somaiya यांच्या सुरक्षेत CISF जवान कमी पडले : Jayant Patil

| Edited By: | Updated on: Feb 11, 2022 | 8:04 PM

किरीट सोमय्यांना सीआयएसएफचं संरक्षण आहे. त्यांना सीआयएसएफ ने प्रोटेक्ट केले पाहिजे होतं. यात ते कमी पडले आहेत याचा अर्थ आहे, असं जयंत पाटील म्हणाले. त्या घटनेवरुन मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यात येतो मात्र मुख्यमंत्री त्या प्रवृत्तीचे आहेत असं अजिबात नाही. त्याला महत्व देणं योग्य नाही. सत्ता नसल्यानं भाजपचं मोरल कमी होत चाललं आहे, असंही ते म्हणाले.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जंयत पाटील (Jayant Patil) आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील दौऱ्यावर असताना जयंत पाटील यांनी टीव्ही 9 मराठी सोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी हिजाब, किरीट सोमय्या, (Kirit Somiaya) महाविकास आघाडी, चंद्रकांत पाटील यांच्यासंदर्भात भाष्य केलं. गेल्या आठवड्यात किरीट सोमय्यांना गेल्या आठवड्यात झालेल्या धक्काबुक्कीवर देखील जयंत पाटील यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. किरीट सोमय्यांना सीआयएसएफचं संरक्षण आहे. त्यांना सीआयएसएफ ने प्रोटेक्ट केले पाहिजे होतं. यात ते कमी पडले आहेत याचा अर्थ आहे, असं जयंत पाटील म्हणाले. त्या घटनेवरुन मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यात येतो मात्र मुख्यमंत्री त्या प्रवृत्तीचे आहेत असं अजिबात नाही. त्याला महत्व देणं योग्य नाही. सत्ता नसल्यानं भाजपचं मोरल कमी होत चाललं आहे, असंही ते म्हणाले.