भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार? शिवसेनेच्या नेत्याचा काय मोठा दावा?

| Updated on: Jun 02, 2023 | 10:14 AM

VIDEO | 'मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार', शिवसेनेच्या नेत्यानं काय व्यक्त केला विश्वास

Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवसस्थानी काल गुरूवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळाली. शिवसेनेत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका अश्विनी माटेकर यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं आहे. तर अश्विनी माटेकर यांच्यासह मुंबईीतील चांदिवलीतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचाही शिवसेनेत प्रवेश झाला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘गेल्या १० महिन्यांपासून असे धक्के उद्धव ठाकरे यांना बसताय. गेले अडीच वर्ष सामान्य शिवसैनिकाला वर्षांचं दार बंद होतं. मात्र आता ते खुले झाले आहे. काल अश्विनी माटेकर यांचा प्रवेश झाला तर रोज येथे अनेक पक्षप्रवेश होत असतात. ठाकरे गटात जे राहिलेत त्यांना खोटं बोलून थांबवण्याचा प्रयत्न होतोय. मात्र यावर पडदा उठला आहे.’, असे ते म्हणाले. तर भविष्यात NCP च्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार का? यावर बोलताना शिंदे म्हणाले, राष्ट्रवादी, राष्ट्रवादी काँग्रेस असतील किंवा अन्य पक्ष असतील त्यांना शिवसेना सामावून घेणार असल्याचे त्यांनी म्हटलं.