शाळांनी पालकांसोबत कसं वागावं याची कार्यपद्धती ठरवणार : नीलम गोऱ्हे
खाजगी शाळांनी पालकांसोबत कसे वागावे याची कार्यपद्धती ठरवली जाणार असल्याचं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी खाजगी शाळेत बाऊन्सर नेमू नयेत. सुरक्षारक्षक नेमायचे झाल्यास ते नोंदणीकृत व अधिकृत संस्थेकडून घ्यावेत, असं म्हटलंय. खाजगी शाळांनी पालकांसोबत कसे वागावे याची कार्यपद्धती ठरवली जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. प्रत्येक खाजगी शाळांमध्ये फलक लावावेत आणि त्या फलकावर शाळेशी संबंधित शिक्षण विभागातील अधिका-यांची नावे संपर्क क्रमांकासह लिहावीत. तक्रार आल्यास शिक्षण विभागाने 3 महिन्यांच्या आत चौकशी करून अहवाल पाठवावा, अशा विविध प्रकारच्या कार्यपद्धती लागू करण्यात येतील, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.क्लाईन मेमोरियल शाळेत बाऊन्सरकडून पालकांना झालेल्या मारहाणीबाबत विधान परिषद उपसभापती निलम गो-हे यांच्याकडं बैठक पार पडली. या बैठकीत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड,शिक्षण विभागाचे अधिकारी आणि पुण्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते. पुण्यातील ज्या शाळेत खाजगी बाऊन्सरकडून पालकांना जी मारहाण झाली होती. याप्रकरणी शिक्षण विभाग आणि पोलिसांच्या चौकशीत विसंगती. बाऊन्सर कडून मारहाण झाल्याचे शिक्षण विभागाच्या चौकशीत समोर आलेले आहे. तर दुसरीकडं पोलिसांच्या चौकशीत मात्र मारहाण झाली नसल्याचे म्हटलंय. त्यामुळं पोलिसांनी शिक्षण विभागाचा अहवाल घेवून कारवाई करावी. असं या समितीत ठरलंय.
