“प्रमुख पार्टी कोण हे पाहावं लागेल?, असं निवडणूक आयोगानं म्हटलं”, शिंदे गटाच्या वकिलांचा दावा

| Updated on: Sep 27, 2022 | 12:58 PM

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सध्या शिंदे गटाचे वकील नीरज कौल युक्तीवाद करत आहेत.

Follow us on

संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Government Politics Crisis) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सध्या शिंदे गटाचे वकील नीरज कौल (Neeraj Kaul) युक्तीवाद करत आहेत. “प्रमुख पार्टी कोण हे पाहावं लागेल?, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे”, असा दावा शिंदे गटाचे वकिल नीरज कौल यांनी केला आहे. आम्हाला अपात्रतेची नोटीस देण्यात आली. 22 रोजी , हा 21 रोजी बहुसंख्य गटाने उपसभापतींना हटवण्याची नोटीस बजावली. जी प्रलंबित होती. न्यायालयाने उत्तर दाखल करण्यासाठी 12 जुलैपर्यंत मुदत दिली. त्यानंतर फ्लोअर टेस्ट मागवली. राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं. पण सुनील प्रभू यांनी फ्लोअर टेस्ट न घेण्याची विनंती करणारी रिट दाखल केली. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय प्रलंबित होता हे लक्षात घेऊन. आम्ही म्हणालो की तुम्ही फ्लोअर टेस्टला का सामोरं जात नाही, असा युक्तीवाद नीरज कौल यांनी केला आहे.