गृहमंत्री अमित शहांनी गोळीबाराचे आदेश दिले असो की नसो दोषी तेच, कारण…. बड्या नेत्याच्या विधानानं खळबळ
नीट पेपर प्रकरणावरून देशभरात आंदोलनं सुरू असताना दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये गोंधळ उडाला. यावेळी बिहार तसेच अन्य राज्यांमध्येही आंदोनांनी व्यापक रुप घेतलं होतं. यावेळी काही ठिकाणी आंदोलकांवर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे.
नीट पेपर प्रकरणावरून देशभरात आंदोलनं सुरू असताना दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये गोंधळ उडाला. यावेळी बिहार तसेच अन्य राज्यांमध्येही आंदोनांनी व्यापक रुप घेतलं होतं. यावेळी काही ठिकाणी आंदोलकांवर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याकडून राजीनाम्याची मागणी केली.
संजय राऊत म्हणाले, “आता या सगळ्या पापांचं फळ हे अमित शाह यांच्या पदरात टाकावंच लागेल. जालियनवाला हत्याकांडात आम्ही जनरल डायर पाहिला होता. तर आता जंतरमंतरवर आम्ही जनरल कायर बघितला.” तसेच, “बिहारमध्ये गोळीबाराचे आदेश दिले असो किंवा नसो, अमित शाह दोषी आहेत. त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा,” असेही त्यांनी म्हटले.
राऊत यांनी पुढे, “जर त्यांनी आदेश दिले नसतील तर गृहमंत्री म्हणून जबाबदारी त्यांची आहे. आणि आदेश दिले असतील तर विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला,” असा दावा केला. तसेच संसद मार्ग पोलीस ठाण्यातील नोंदी भविष्यात समोर येतील, असेही ते म्हणाले.
याशिवाय, अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यावरही राऊत यांनी टीका करत पुणेकरांनी त्याला विरोध करावा, असे आवाहन केले.
