एमपीएससी विद्यार्थ्यांच्या 18 तासांच्या आंदोलनाला यश, नवा अभ्यासक्रम 2025 पासूनच होणार लागू

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या 18 तासांच्या आंदोलनाला यश, नवा अभ्यासक्रम 2025 पासूनच होणार लागू

| Updated on: Jan 31, 2023 | 2:36 PM

एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम, नवे नियम यांना मुख्यमंत्र्यांकडून तत्वतःमान्यता, लवकरच होणार अधिकृत घोषणा

मुंबई : पुण्यातील अलका चौकात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. एमपीएससी परीक्षेसाठीचे नवे नियम आणि अभ्यासक्रम हा 2023 पासून लागू न करता 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला यश आले असून एमपीएससीचे नवीन नियम 2025 पासून लागू होणार असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या निर्णयामुळे एमपीएसी परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न मंत्रिबैठकीत मांडला होता. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडून तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती आहे. तर एमपीएससीला राज्य सरकारतर्फे विनंती करण्यात येणार असून यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Published on: Jan 31, 2023 02:32 PM