Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणच्या मैत्रिणीची पोलिसांकडून चौकशी

Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणच्या मैत्रिणीची पोलिसांकडून चौकशी

| Updated on: Jun 01, 2025 | 5:50 PM

Nilesh Chavan News : निलेश चव्हाणच्या मैत्रिणीची चौकशी पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. तो पुण्यातून पसार झाला तेव्हापासून ही मैत्रीण निलेशच्या सोबत

पोलिसांकडून निलेश चव्हाणच्या मैत्रिणीची चौकशी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. निलेश चव्हाणचं पहिलं लोकेशन एका घटस्फोटीत मैत्रिणीमुळे मिळालं. मात्र या प्रकरणाशी निलेशच्या मैत्रिणीचा संबंध नसल्याने तिला सोडून देण्यात आल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं आहे.

निलेश चव्हाण पुण्यातून पसार झाला तेव्हापासून ही मैत्रीण निलेशच्या सोबत होती. फिरायला जाऊ असं निलेशने तिला सांगितलं. तसंच तिच्या फोनचा वापर देखील केला. दिल्लीतून निलेश गोरखपूरच्या बसमध्ये बसला आणि त्याची मैत्रीण पुण्याला परतली. त्यानंतर निलेश चव्हाणच्या या मैत्रिणीची चौकशी पोलिसांकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यानंतर तिला सोडून देण्यात आलं आहे.

दरम्यान, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश हगवणे याच्यावर वैष्णवीच्या कुटुंबाला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्याला पोलिसांनी नेपाळमधून ताब्यात घेतलेलं असून तो कोठडीत आहे.

Published on: Jun 01, 2025 05:50 PM