Nilesh Lanke : हम करे सो कायदा हे.. ; निलेश लंके सरकारवर संतापले
Nilesh Lanke Slams Mahayuti : खासदार निलेश लंके यांनी विधानभवनात झालेल्या राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
विधान भवन परिसरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात झालेल्या राड्यानंतर काल मध्यरात्री आमदार आव्हाड यांनी आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी अक्षरशः आमदार आव्हाडांना पोलिसांनी फरपटत नेले, तर आमदार रोहित पवार यांच्यात आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्येही वाद झाला यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ज्या विधान भवनात कायदे बनवले जातात तिथे अशा पध्दतीने वागले जात असेल तर हे चुकीचे आहे. सरकारला वाटत असेल की हम करे सो कायदा तर हे खपवून घेतले जाणार नाही. पोलिसांवर सरकारचा दबाव आहे, मात्र जनतेचा उद्रेक झाल्यास चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांचे कपडे उतरवल्याशिवाय राहणार नाही असं निलेश लंके यांनी म्हंटले आहे.
Published on: Jul 18, 2025 04:44 PM
