VIDEO : Nitesh Rane Anticipatory Bail Denied | नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता

VIDEO : Nitesh Rane Anticipatory Bail Denied | नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता

| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 2:34 PM

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळला. जवळपास दोन आठवड्यांच्या अज्ञातवासानंतर दोनच दिवसांपूर्वी नितेश राणे माध्यमांसमोर आले होते.

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळला. जवळपास दोन आठवड्यांच्या अज्ञातवासानंतर दोनच दिवसांपूर्वी नितेश राणे माध्यमांसमोर आले होते. त्यानंतर आता कोर्टाने त्यांना धक्का दिला आहे. नितेश राणे हे संतोष परब यांच्यावरील हल्लेखोरांच्या संपर्कात असल्याचा आणि हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी सत्र न्यायालयाच्या पाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज नाकारत त्यांना मोठा झटका दिला आहे. साक्षीदारांवर दबाव आणू नये, पासपोर्ट जमा करावा, अशा अटी नितेश राणेंना घालण्यात आल्या आहेत.