Nitesh Rane | राणे साहेबांच्या पुढाकाराने चिपी विमानतळ सुरू : नितेश राणे

Nitesh Rane | राणे साहेबांच्या पुढाकाराने चिपी विमानतळ सुरू : नितेश राणे

| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 3:02 PM

बाकीचे आंदोलन करीत होते, काँट्रॅकसाठी भांडत होते तेव्हा राणे साहेब विमानतळासाठी आणि अनेक विकास प्रकल्पसाठी संघर्ष करीत होते. जे आज श्रेयासाठी स्पर्धा करीत आहेत ते जेव्हा विमानतळ भूमिपूजन झाले तेव्हा आंदोलन करीत होते, असं नितेश राणे म्हणाले.

विकासाच्या विमानाचे टेक ऑफ होणार आहे. श्रेयवादात मला जायचे नाही. पण लोकांना आठवणीत आहेत. बाकीचे आंदोलन करीत होते, काँट्रॅकसाठी भांडत होते तेव्हा राणे साहेब विमानतळासाठी आणि अनेक विकास प्रकल्पसाठी संघर्ष करीत होते. जे आज श्रेयासाठी स्पर्धा करीत आहेत ते जेव्हा विमानतळ भूमिपूजन झाले तेव्हा आंदोलन करीत होते. आम्हला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. सिद्ध कुणाला करायला लागते ज्याला सिद्ध करायचे असते. आम्ही जिल्हावासियासाठी काम केले आहे. त्यामुळे ज्याला श्रेय घ्यायचे, नाचून दाखवायचे आहे त्यांनी ते करावे. पण आम्हला समाधान याचे की राणे साहेबांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत आहे, असं नितेश राणे म्हणाले.