मतांच्या राजकारणासाठी मुख्यमंत्री आपल्या नगरसेवकांना पाठीशी घालतात- नितेश राणे
सिंहासनावर धृतराष्ट्र बसले असेल तर कौरवांच्या मर्जीचे राज्य येतं असा खोचक टोला आमदार नितेश राणे (Nitiesh rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav thackrey) यांना लगावला आहे. 9 जून रोजी मुख्यमंत्री निवास्थानाजवळ असलेल्या शास्त्री नगर परिसरात एक अनधिकृत इमारत कोसळली (shastri nagar building collapse) . यामध्ये एकाच मृत्यू झाला तर 17 जण मृत्यूशी झुंज देत आहेत. […]
सिंहासनावर धृतराष्ट्र बसले असेल तर कौरवांच्या मर्जीचे राज्य येतं असा खोचक टोला आमदार नितेश राणे (Nitiesh rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav thackrey) यांना लगावला आहे. 9 जून रोजी मुख्यमंत्री निवास्थानाजवळ असलेल्या शास्त्री नगर परिसरात एक अनधिकृत इमारत कोसळली (shastri nagar building collapse) . यामध्ये एकाच मृत्यू झाला तर 17 जण मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनास्थळी मुख्यमंत्र्यांनी अद्याप भेटही न दिल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. मतांच्या राजकारणासाठी मुंबई बाहेरून आलेल्या लोकांना शिवसेनेचे नगरसेवक पाठीशी घालत आहेत असेही ते म्हणाले. एकीकडे विरोधकांना अनधिकृत बांधकामासाठी नोटीस पाठवायच्या आणि दुसरीकडे आपलेच नगरसेवक अनधिकृत बांधकामांना परवानगी देत असून मुख्यमंत्री गप्प असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
Published on: Jun 17, 2022 03:23 PM
