माझा व्हिडिओ येईपर्यंत कुणीही आंदोलन करु नये – हिंदुस्तानी भाऊ

माझा व्हिडिओ येईपर्यंत कुणीही आंदोलन करु नये – हिंदुस्तानी भाऊ

| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 10:45 AM

जो पर्यंत माझा व्हिडीयो किंवा ऑडीओ येत नाही कुणी आंदोलन करू नये, हिंदूस्तानी भाऊचा वकिलांकर्वी विद्यार्थ्यांना संदेश दिला आहे. वकिल महेश मुळ्ये यांनी व्हिडीयो जारी करत दिली माहीती.

सोमवारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराबाहेर झालेल्या विद्यार्थी आंदोलनाने (Student Protest) संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. राज्य सरकारला तर या आंदोलनाने घाम फोडला. परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांचा लोंढा शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर जमाला. यावेळी पोलिसांकडून आंदोलकर विद्यार्थ्यांना आवरण्यासाठी सौम्य लाठीमार करण्यात आला. या आंदोलनाच्या मागे कोण आहे याचा शोध पोलिसांनी सुरू केल्यानंतर त्यांच्यासमोर हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) हे नाव आलं त्यानंतर पोलिसांच्या हाती आंदोलनामागे असणार काही अन्य व्हिडिओही लागले. त्यानंतर हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानं त्याला तीन दिवस कोठडी मुक्कामी धाडलं, मात्र जो पर्यंत माझा व्हिडीयो किंवा ऑडीओ येत नाही कुणी आंदोलन करू नये, हिंदूस्तानी भाऊचा वकिलांकर्वी विद्यार्थ्यांना संदेश दिला आहे. वकिल महेश मुळ्ये यांनी व्हिडीयो जारी करत दिली माहीती.