Leopard Terror: बिबट्याची दहशत लैच बेक्कार! ‘या’ जिल्ह्यात पोरं वेल सेटल पण बायको कोणी देईना.. सोयरिक जुळण्यास ब्रेक
बिबट्याच्या दहशतीमुळे उत्तर पुणे जिल्ह्यात नागरिक भयभीत असून, पालक मुलामुलींची लग्ने नाकारत आहेत. बिबटे पकडण्यात यंत्रणेला येणाऱ्या अडचणींवर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत बिबटमुक्त गावाची मागणी केली आहे.
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय रोहन या मुलाचा मृत्यू झालेल्या कुटुंबाला भेटण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक पिंपरखेडमध्ये दाखल झाले होते. पीडित कुटुंबाने मंत्र्यांच्या भेटीनंतरही, आमचा रोहन परत येणार नाही अशी हृदयद्रावक प्रतिक्रिया व्यक्त केली असून, इतर मुलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
तर बिबट्याच्या दहशतीमुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. या भीतीच्या वातावरणात पालक आपल्या मुलामुलींच्या लग्नासाठीची सोयरीक नाकारत आहेत. ‘वेल सेटल’ असूनही अनेक मुलांची लग्ने रखडली आहेत, ज्यामुळे सामाजिक जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. ग्रामस्थांच्या मते, बिबट्या केवळ एका मळ्यात नाही, तर प्रत्येक गावात अनेक मळ्यांमध्ये चार ते पाच बिबटे आढळत आहेत.
