Laxman Hake : जरांगे पाटलांचं आंदोलन शरद पवार चालवतात तर रोहित पवार…. लक्ष्मण हाकेंच्या आरोपानं खळबळ

Laxman Hake : जरांगे पाटलांचं आंदोलन शरद पवार चालवतात तर रोहित पवार…. लक्ष्मण हाकेंच्या आरोपानं खळबळ

| Updated on: Aug 31, 2025 | 3:03 PM

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भाष्य करताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बघा नेमकं काय म्हणाले हाके?

मनोज जरांगे पाटील यांच्या झुंडशाहीपुढे सरकार हतबल आहे. जरांगेंचा इतिहास पाहता ते दंगल घडवू शकतात, मुंबईला वेठीस धरू शकतात. त्यामुळे मनोज जरांगे पाटील याला मुंबईला येऊ देऊ नका, हे आधीच सांगितलं होतं. कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचं काम मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक करत आहे. लोकशाहीमध्ये मोर्चा, आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण वाटेल ती मागणी करायची जी पूर्णच होणार नाही. त्यामुळे मुंबईची व्यवस्था वेठीस धरायची हे अराजकतेचं लक्षण असल्याचे म्हणत हाकेंनी जरांगेंवर निशाणा साधला. तर आरक्षणाचा मूळ हेतू प्रतिनिधीत्वाचा, संधी देण्याचा आहे. इथे गरिबी हटावचा प्रोग्राम आरक्षणाला मान्य नाही, असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन शरद पवार चालवतात असं म्हणत हाकेंनी पवारांवर हल्लाबोल केला तर रोहित पवार रसद पुरवतात, असा आरोपही हाकेंनी केला आहे.

Published on: Aug 31, 2025 02:45 PM