उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या ‘त्या’ टीकेवरून मनोज जरांगे पाटलांना लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल

उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या ‘त्या’ टीकेवरून मनोज जरांगे पाटलांना लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल

| Updated on: Jun 21, 2024 | 5:55 PM

छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द उद्धवस्त करतो, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. यानंतर लक्ष्मण हाके चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी या टीकेवर पटवार केलाय. हाके म्हणाले, मनोज जरांगे नेहमी आमचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांना टार्गेट करुन म्हणतात...

लक्ष्मण हाके यांच्या मागे छगन भुजबळ असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला आहे. इतकंच नाहीतर छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द उद्धवस्त करतो, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. यानंतर लक्ष्मण हाके चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी या टीकेवर पटवार केलाय. हाके म्हणाले, मनोज जरांगे नेहमी आमचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांना टार्गेट करुन म्हणतात की, भुजबळ तू सगळं खाल्लं आहे. या जरांगेंना माझ्या एक सवाल आहे. राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायला जनता तयार आहे ना? तू कोण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा? या महाराष्ट्रातला ओबीसी, वीजीएनटी, एसबीसी हा जर एक झाला आणि त्या लोकांनी स्वाभिमानाला मत दिलं. तर जरांगे येणारा काळ ठरवेल, फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र काय आहे, असे वक्तव्य करत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांना चांगलंच फटकारलंय.

Published on: Jun 21, 2024 05:55 PM