Mangesh Sasane : ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद, धनंजय मुंडे म्हणाले…

| Updated on: Dec 15, 2025 | 11:43 AM

ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या वाहनावर बीड जिल्ह्यात अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. आमदार धनंजय मुंडे यांनी कारवाईची मागणी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या गाडीवर बीड जिल्ह्यात अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. माजलगावहून पुण्याकडे जात असताना धारूर गावाच्या हद्दीत रात्री पावणेबाराच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या काही जणांनी ससाणे यांच्या वाहनावर दगडफेक केली. या हल्ल्यात गाडीच्या मागील आणि डाव्या बाजूची काच फुटली. या घटनेनंतर धारूर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश ससाणे यांनी स्थानिक आमदार विजयसिंह पंडीत आणि आमदार प्रकाश सोळंके यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्याचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. आमदार धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. या हल्ल्यामागे कोण आहे, हे पोलीस तपासातून समोर येईल.

Published on: Dec 15, 2025 11:43 AM