PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक
PM Modi Meetings After Pahalgam Attack : पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महत्वाच्या बैठका सातत्याने होत आहेत.
देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात महत्वाची बैठक सुरू आहे. सध्या दिल्लीत बैठकांच सत्र सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही आणखी एक महत्वाची बैठक पार पडत आहे. डोवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात ही बैठक तब्बल 40 मिनिटं चालली.
पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 27 पर्यटकांनी आपला जीव गमावला. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात काही कठोर निर्णय घेतले. त्यानंतर दोन्ही देशांत तणाव वाढला आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी सातत्याने मोठ्या बैठका पार पडत आहेत. त्यातच आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासीबत देखील एक बैठक पार पडली आहे. पाकिस्तानतसोबत वाढलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत युद्धजन्य परिस्थितीत या बैठका अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहे.
Published on: May 06, 2025 01:54 PM
