महाशिवरात्रीनिमित्त बीडच्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर सज्ज

महाशिवरात्रीनिमित्त बीडच्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर सज्ज

| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 10:02 AM

महाशिवरात्रीनिमित्त बीडच्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर सज्ज झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी वैद्यनाथ मंदिराची यात्रा रद्द करण्यात आलीय. केवळ दर्शनासाठी मध्यरात्री बारा वाजल्यापासून मंदिर खुले करण्यात आलंय. तर सायंकाळी सात वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मंदिरात प्रभू वैद्यनाथाची महापूजा पार पडणार आहे.

महाशिवरात्रीनिमित्त बीडच्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर सज्ज झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी वैद्यनाथ मंदिराची यात्रा रद्द करण्यात आलीय. केवळ दर्शनासाठी मध्यरात्री बारा वाजल्यापासून मंदिर खुले करण्यात आलंय. तर सायंकाळी सात वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मंदिरात प्रभू वैद्यनाथाची महापूजा पार पडणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आलीय. मंदिर परिसरात 104 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जातेय. 20 पोलीस अधिकारी, दीडशे पोलीस कर्मचारी, 100 होमगार्ड आणि आरसीपीची तुकडी तैनात करण्यात आलीय. महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शनासाठी राज्यासह परराज्यातील भाविकांनी गर्दी केलीय. राज्यातभरात आज महाशिवरात्री निमित्त अनेक भाविक दर्शनासाठी मंदीरात जात असतात. त्यामुळं राज्यातल्या अनेक मंदिरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळानंतर मंदील खुलं झाल्यानं अनेक भाविक खुष असल्याचं पाहायला मिळत आहे.