Iran Israel War : इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर B-2 बॉम्बर विमानांचा हल्ला, नेमकं कुठून कसं केलं टार्गेट?

Iran Israel War : इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर B-2 बॉम्बर विमानांचा हल्ला, नेमकं कुठून कसं केलं टार्गेट?

| Updated on: Jun 22, 2025 | 7:16 PM

इराणच्या तीन अणुप्रकल्पांवर अमेरिकेने बॉम्ब वर्षाव केला. अमेरिकेचा इराणच्या अणुप्रकल्पांवर बी 2 बॉम्बर विमानाने हल्ला तर फोर्डो, नतांज इस्फहान या अणुतळ्यांवर बी 2 बॉम्बर विमानाने हल्ला केलाय. इराणवरच्या हल्ल्याला अमेरिकेकडून ऑपरेशन मिड नाईट हॅमर असं नाव देण्यात आलंय

इस्राईल-इराण संघर्षात अमेरिकेने उडी घेतली अमेरिकेनं इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला केला. फोर्डो, नतांज आणि इस्फहान या तीन अणुतळांवर अमेरिकेनं बी 2 बॉम्बर विमानांनी हल्ले केले. न्यूयॉर्क टाईम्स आणि रॉयटर्सच्या अहवालानुसार, अमेरिकन बी 2 बॉम्बर विमानांनी अमेरिकेतल्या व्हाईट मॅन एअरफोर्स बेसवरून उड्डाण घेतलं होतं. 12000 किलोमीटरचे अंतर कापून अमेरिकन विमानांनी इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला केला. अमेरिकेनं हल्ल्यासाठी GBU 57 बंकर बस्टर बॉम्ब वापरले. हे बॉम्ब जवळपास 13500 किलो वजनाचे असल्याची माहिती आहे.

GBU 57 बंकर बस्टर बॉम्ब 200 फूट खोलीवरचा कॉन्क्रीट किंवा 60 मीटरपर्यंतची माती भेदण्यासाठी सक्षम आहे. एका बी 2 बॉम्बर विमानात दोन GBU 57 बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता असते. त्यामुळे या हल्ल्यासाठी किमान तीन बी 2 बॉम्बर विमान वापरली गेली असण्याची शक्यता आहे. नतांज आणि इस्फहान या अणुप्रकल्पांवरही GBU 57 बॉम्बने हल्ला करण्यात आला.

इराणवरच्या हल्ल्यासाठी अमेरिकेनं टॉमहॉक मिसाईल्सचा वापर केल्याची ही माहिती आहे. या मिसाईल्स अमेरिकेनं इराणच्या ड्रोन आणि लष्करी तळांना नष्ट करण्यासाठी वापरल्याची माहिती आहे. अमेरिकेनं हल्ला केल्याचं सांगितलं असलं तरी कोणत्या तळांवरून हे हल्ले करण्यात आले याची माहिती दिलेली नाही.

Published on: Jun 22, 2025 07:16 PM