Operation Sindoor : भारतीय विमानं पाकमध्ये 100 मैल आत घुसली अन्… वॉशिंग्टन पोस्टनं पाकिस्तानला तोंडावरच पाडलं

Operation Sindoor : भारतीय विमानं पाकमध्ये 100 मैल आत घुसली अन्… वॉशिंग्टन पोस्टनं पाकिस्तानला तोंडावरच पाडलं

| Updated on: May 15, 2025 | 7:22 PM

भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानमधला एअरबेसचा मोठं नुकसान झालंय असं विश्लेषण अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रकडून करण्यात आलेलं आहे. पाकमधील सॅटेलाईट इमेजचा वापर करून वॉशिंग्टन पोस्टन हे विश्लेषण केलं आहे.

भारतीय हल्ल्यात कोणतही नुकसान झालं नाही हा पाकिस्तानचा दावा अमेरिकेच्या प्रतिष्ठित वृत्तपत्रानं खोटा ठरवलाय. भारतीय विमान पाकिस्तानच्या हद्दीत 100 मैलांपेक्षा जास्त अंतरावर पोहोचली होती असं वॉशिंग्टन पोस्टनं म्हटलंय. भारताने पाकिस्तानच्या संरक्षण तळांवर अचूक हल्ले केले आणि या हल्ल्यात पाकिस्तान हवाई दलाची क्षमता दुबळी झाली. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या एअरबेसचे तीन हँगर, दोन धावपट्ट्या आणि वायुसेनेन वापरलेल्या दोन फिरत्या इमारतींच नुकसान झालं. एका विमानाला सुद्धा भारताच्या हल्ल्यात मोठं नुकसान झाल्याचं वॉशिंग्टन पोस्टमध्ये म्हटलय. वॉशिंग्टन पोस्टने 27 सॅटेलाईट इमेजेसचा अभ्यास केला. त्याच्या आधारेच वॉशिंग्टन पोस्टन पाकिस्तानला तोंडावर पाडलंय. वॉशिंग्टन पोस्टन पाकिस्तानच्या तीन महत्त्वाच्या एअरबेसच हल्ल्यानंतरच वर्णन केलं. रावळपिंडीतल्या नूर खान एअरबेसवर पाकिस्तानची दोन नियंत्रण केंद्र नष्ट झाली आहेत. नूर खान एअरबेसच्या पार्किंग लॉटवर सुद्धा मोठा हल्ला झाला.  यासह वॉशिंग्टन पोस्टने भोलारी एअरबेसचही अचूक वर्णन केलं आहे, बघा व्हिडीओ…

Published on: May 15, 2025 07:22 PM