Operation Sindoor : भारताच्या एअर स्ट्राईकनं पाकच्या चिंध्या-चिंध्या… लॉन्चपॅड अन् चौक्या बेचिराख, बघा नवा VIDEO

Operation Sindoor : भारताच्या एअर स्ट्राईकनं पाकच्या चिंध्या-चिंध्या… लॉन्चपॅड अन् चौक्या बेचिराख, बघा नवा VIDEO

| Updated on: May 15, 2025 | 1:55 PM

पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकच्या अनेक लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तान उद्ध्वस्त झाला आहे. पाकिस्तानी लष्कराने स्वतः हे मान्य केले आहे. भारताच्या प्रत्युत्तर हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

पहलाग हल्ल्याचा बदला भारत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेत आहे. भारतीय सैन्य जमिनीपासून हवेपर्यंत पाकिस्तानला जशास तसं उत्तर देत आहे. गेल्या दिवसांपासून रात्रीच्या वेळी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी क्षेपणास्त्रांना भारतीय सैन्याकडून उद्ध्वस्त करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्याकडून एअर स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानचे दहशतवादी लाँच पॅड देखील बेचिराख करण्यात आले त्याचेच व्हिडीओ आता समोर येऊ लागले आहेत.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानचे कंबरडे कसे मोडले आहे हे पाहता येईल. या व्हिडिओमध्ये भारतीय सैन्य पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड नष्ट केले आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळतंय.

Published on: May 15, 2025 01:55 PM