मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवार यांनी घेतला खरपूस समाचार, ‘घडी काही मोडणा, यांना काही कुणी पावना’

| Updated on: Feb 05, 2023 | 3:12 PM

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यासह राज्य सरकारला मंत्रिमंडळ विस्तारावरून लगावला टोला

Follow us on

अहमदनगर : ‘वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं आहे. राज्याचं कारभार चालवण्यासाठी सर्व वयोगटातील लोकांना प्राधान्य दिले गेले पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही, ४० आमदार आशेवर असतील त्यांना कधी मंत्री बनवणार, पण मंत्रिपद मिळावे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगवेगळ्या देवांना नवस, अभिषेक करत बसले आहेत’, असे म्हणत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यासह राज्य सरकारला मंत्रिमंडळ विस्तारावरून टोला लगावला आहे. सध्या सुरू असलेला कारभार महाराष्ट्राने कधी पाहिला नाही, शिंदे सरकारला भिती वाटते की, जर मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि इतरांना जे सांगितलेले पूर्ण झाले नाही तर ते म्हणतील आम्ही तुम्हाला सोडून जातो, त्यामुळे राज्याचे नुकसान होत आहे. राज्यातील मोठे प्रकल्प परराज्यात जात असल्याची टीकाही अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.