भाजपच्या आमदारांकडून अर्थसंकल्पाचे स्वागत
बेलापूरमधील महाराष्ट्र भवनसाठी शंभर कोटीचा निधी जाहीर केल्याबद्दल विरोधी पक्षातील आमदार मंदा म्हात्रे यांनी या सरकारेच अभिनंदन केले आहे.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर एकीकडे टीकाकारांनी टीका केल्या तर दुसरीकडे मात्र विरोधकांच्याच पक्षातील आमदार मंदा म्हात्रे यांनी मात्र अर्थसंकल्पानंतर महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन आणि कौतूक केले आहे. वॉटर टॅक्सीच्या भाडे कमी करण्याच्या प्रश्नावर अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला, त्यानंतर अजितदादांनी हा प्रश्न समजून घेऊन वॉटर टॅक्सीचे भाडे कमी करण्यात आले आहे. त्याबरोबरच बेलापूरमधील महाराष्ट्र भवनसाठी शंभर कोटीचा निधी जाहीर केल्याबद्दल विरोधी पक्षातील आमदार मंदा म्हात्रे यांनी या सरकारेच अभिनंदन केले आहे.
