tv9 Marathi Special Report | पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्री फडणवीसांचे समर्थन…
छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू, फुलेंचा अपमान करणाऱ्यांचा सन्मान कसा काय होऊ शकतो? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. संविधानाची थट्टा करण्यावरून कोश्यारींना पद्मभूषण दिला असेल तर त्याचा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निषेध केला आहे. अनेक पक्षाच्या नेत्यांनी यावर निषेध केला आहे. विरोधकांनी टीका केली असली तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोश्यारींच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेत. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि वरिष्ठ राजकारणी भगत सिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय राजकारणातील त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत समाजसेवा, प्रशासनिक नेतृत्व आणि लोककल्याणाच्या उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
मात्र विरोधकांनी भगत सिंह कोश्यारींना पुरस्कार देण्यावरून विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू, फुलेंचा अपमान करणाऱ्यांचा सन्मान कसा काय होऊ शकतो? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. संविधानाची थट्टा करण्यावरून कोश्यारींना पद्मभूषण दिला असेल तर त्याचा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निषेध केला आहे. अनेक पक्षाच्या नेत्यांनी यावर निषेध केला आहे. विरोधकांनी टीका केली असली तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोश्यारींच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.
