Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
Baisaran Valley attack update : पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा शोध भारतीय लष्कराला लागला आहे. सध्या दहशतवादी आणि भारतीय लष्करात गोळीबार आणि चकमक सुरू आहे.
पहलगाम हल्ल्यातील अतिरेक्यांना भारतीय लष्कराने घेरल्यानंतर आता दोन्ही बाजूंनी चकमक सुरू झाली आहे. भारतीय लष्कर आणि दहशतवाडी यांच्यात गोळीबार सुरू झाला आहे.
पहलगाम येथे बैसरन खोऱ्यात दहशतवाडी हल्ला झाला होता. त्यानंतर हल्ला करणारे 6 अतिरेकी पळून गेले होते. या अतिरेक्यांचा शोध काश्मिरच्या घनदाट जंगलात भारतीय लष्कराकडून घेतला जात होता. पाकिस्तानी अतिरेक्यांची भारतात असलेली घरं आणि हल्ल्यातील संशयित अतिरेक्यांची घरं देखील लष्कराने उद्ध्वस्त केलेली आहेत. भारतीय लष्कर हे सतत या अतिरेक्यांच्या मागावर होतं. 4 वेळा लष्कराने अतिरेक्यांचं लोकेशन देखील शोधल होतं. आज भारतीय लष्कराने या दहशतवाद्यांना घेरलं आहे. त्यानंतर दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
Published on: Apr 29, 2025 11:08 AM
