Pahalgam Terror Attack Updates : एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आलेला आहे. यासाठी एनआयएचे डिजी सदानंद दाते यांच्याकडून सध्या बैठकांना वेग आला आहे.
जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये एनआयएचे डिजी सदानंद दाते यांची महत्वाची बैठक सुरू झाली आहे. सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीरच्या पोलीसदलातील अधिकाऱ्यांसोबत ही महत्वाची बैठक होत आहे. एनआयएच्या डिजींचा आज काश्मीरमध्ये दूसरा दिवस आहे. काल पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी डिजी बैसरन खोऱ्यात हल्ला झालेल्या ठिकाणी पोहोचले होते. यावेळी जवळपास 3 तास त्यांच्या पथकाने या ठिकाणी पाहणी केली. या पाहणीनंतर आज सकाळपासूनच डिजी सदानंद दाते यांनी बैठका घेण्यास सुरुवात केलेली आहे. या पाहणीत एनआयएने घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात पुरावे गोळा केलेले होते. तसंच 3 हजार पेक्षा जास्त लोकांची अजून याबाबत चौकशी होणं बाकी आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा टीव्ही9 मराठीचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी घेतला आहे.
Published on: May 02, 2025 02:36 PM
