Pahalgam Attack : चिखलात फसलेल्या चपला अन् जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळाल्याच्या खुणा; बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राऊंड रिपोर्ट

Pahalgam Attack : चिखलात फसलेल्या चपला अन् जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळाल्याच्या खुणा; बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राऊंड रिपोर्ट

| Updated on: Apr 24, 2025 | 1:20 PM

Baisaran Valley Ground Report : पहलगाममध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांवर मंगळवारी ज्यावेळी अचानक अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हा बैसरनच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक होते. हल्ला झाल्यावर नेमकं काय झालं असेल याचा अंदाज याठिकाणी अस्ताव्यस्त पडलेल्या सामानावरून लावता येतो.

पहलगाममध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांवर मंगळवारी ज्यावेळी अचानक अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हा कोणालाही काहीही समजायच्या आत 26 पर्यटकांनी आपला जीव गमावला होता. प्रत्येक जण कुटुंबासोबत आनंदाचे क्षण साजरे करत असताना अचानक झालेल्या या हल्ल्याने पर्यटक जीव मुठीत धरून पळत सुटले. बैसरन खोऱ्याचा भाग हा दुर्गम आहे. याठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. खोऱ्याच्या सर्व बाजूंनी फक्त जंगल आहे. या खोऱ्यात जायला घोड्यांचा वापर करावा लागतो. त्यामुळे हल्ला झाला त्यावेळी तिथून बाहेर पडायला पर्यटक मिळेल त्या मार्गाने पळत सुटले असतील. याच्या खुना त्या ठिकाणी आता दिसत आहेत.

टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी बैसरन खोऱ्यात हल्ला झाला त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा तिथे पावसाने झालेल्या चिखलात अनेक पर्यटकांच्या चपला फसलेल्या दिसून आल्या. या चपला खोऱ्यातून खाली दरीत जंगलाच्या मार्गाने जाणाऱ्या रस्त्यावर होत्या. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी पर्यटक या मार्गाने पाळले असतील असा अंदाज लावता येत आहे.

Published on: Apr 24, 2025 01:18 PM