Pahalgam Attack Updates : पहलगाम दहशतवादी हल्ला; सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम

Pahalgam Attack Updates : पहलगाम दहशतवादी हल्ला; सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम

| Updated on: Apr 23, 2025 | 4:39 PM

Pahalgam Terrorists Used Code Names : पहलगाम हल्ल्याच्या वेळी अतिरेक्यांनी कोड नेम वापरले असल्याचं समोर आलं आहे. सुरक्षा यंत्रणांना ओळख कळू नये म्हणून अतिरेक्यांनी हे कोड नेम वापरले.

पहलगाम हल्ल्याच्या वेळी अतिरेक्यांनी कोड नेम वापरले असल्याचं समोर आलं आहे. काल पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांनी 26 पर्यटकांना ठार मारलं. या घटनेत अनेक पर्यटक जखमी झालेले आहेत. मृतांमध्ये 6 पर्यटक हे महाराष्ट्रातले होते. हल्लेखोर अतिरेकी हे सैन्यदलाचा ड्रेस घालून आल्याने त्यांच्यावर कोणाला शंका आली नाही. तसंच या अतिरेक्यांनी हल्ल्याच्यावेळी कोड नेम वापरले असल्याचं देखील तपासातून समोर आलं आहे. हल्ल्यावेळी अतिरेक्यांनी मुसा, यूसुफ, अनिस अशी नावं वापरली. ओळख लपवण्यासाठी अतिरेक्यांनी ही खोटी नावं वापरली. आसिफ शेख, सुलेमान शाह, अबू तलाह हे तिघेही TRF चे अतिरेकी आहेत. हे तिघेही अतिरेकी आधी पुछ भागात सक्रिय होते. सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी त्यांनी ही खोटी नावं वापरली.

Published on: Apr 23, 2025 04:39 PM