Pak Army Major Moiz : पाक मेजर मुईझ अब्बासची हत्या, ज्यानं विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा केला होता दावा

Pak Army Major Moiz : पाक मेजर मुईझ अब्बासची हत्या, ज्यानं विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा केला होता दावा

| Updated on: Jun 25, 2025 | 2:38 PM

मेजर मुईझ हे पाकिस्तानी सैन्याच्या सहाव्या कमांडो बटालियनमध्ये तैनात होते. २०१९ मध्ये मेजर मुईझ यांनी विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा केला होता. मुईझ यांना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान नावाच्या दहशतवादी संघटनेने मारले आहे. मुईझ यांना दक्षिण वझिरिस्तानमध्ये मारण्यात आले आहे.

२०१९ मध्ये भारताच्या विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पकडल्याचा दावा करणारे पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी मेजर मुईझ अब्बाज यांची हत्या करण्यात आली आहे. दक्षिण वझिरिस्तानमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली आहे. मेजर मुईझची हत्या ही पाकिस्तानी लष्करासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेजर मुईझ हे सहाव्या कमांडो बटालियनमध्ये तैनात होते. दहशतवाद्यांनी सरगोगाजवळ मुईझवर हल्ला करून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मुईझचा मृत्यू झाला. मेजर मुईझ व्यतिरिक्त, दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्कराचे लान्स नाईक जिब्रानउल्लाह यांनाही ठार मारले आहे.

२०१९ मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईत मुईझ चर्चेत आला होता. त्यावेळी लष्कराचे अधिकारी मेजर मुईझ अब्बाजने भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा केला होता. लष्कराचे अधिकारी मेजर मुईझ अब्बाज मूळचे पाकिस्तानातील चकवाल येथील रहिवासी होते.

Published on: Jun 25, 2025 02:38 PM