Bilawal Bhutto War Threat : ‘आम्ही सिंधू’त रक्त सांडू… बिलावल भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा दिला इशारा
सिंध प्रांतातील मीरपूर खास येथे गुरुवारी झालेल्या एका जाहीर सभेत बोलताना बिलावल भुट्टो यांनी भारताला पुन्हा धमकी दिली आहे. जर भारताकडे पहलगाम हल्ल्याचे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत अन्यथा आरोप करणे थांबवावे. आम्ही आमच्या सिंधूला मरू देणार नाही, असं भुट्टोने म्हटलंय.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर पाऊलं उचलत भारताने सिंधू जल करार रद्द करण्यात आला. हा करार रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो याचा चांगलाच जळफळाट झालाय. सिंधू पाणी कराराबाबत पाकिस्तानमधील राजकीय वातावरण चांगलंच शिगेला पोहोचले आहे. दरम्यान, बिलावल भुट्टोने भारताविरुद्ध युद्धाची धमकी दिली आहे. बिलावल भुट्टो याने सिंधू नदीचं पाणी रोखण्यावरून पुन्हा एकदा पोकळ धमकी देत असे म्हटले की, सिंधू नदीसाठी आम्ही टोकाची भूमिका घ्यायला तयार आहोत, असं वक्तव्य बिलावल भुट्टो याने पुन्हा केलंय. जर मोदी सरकारने सिंधू जल करार स्थगिती केला तर आम्ही नदीत रक्त सांडू. पाकिस्तानला युद्ध नको आहे, पण नाइलाज म्हणून पाकिस्तान मागे हटणार नाही. बघा काय म्हणाला बिलावल भुट्टो?
Published on: May 03, 2025 04:09 PM
