Khawaja Asif : ‘सिंधू’वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी, …तर हल्ला करणार

Khawaja Asif : ‘सिंधू’वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी, …तर हल्ला करणार

| Updated on: May 03, 2025 | 4:58 PM

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर पाऊलं उचलत भारताकडून पाकिस्तानला मोठा फटका देणारे निर्णय घेण्यात आले. यामध्ये सिंधू जल करार स्थगित करण्यात आला. यावरूनच पाक नेत्यांमध्ये चांगलाच जळफळात दिसून येतोय.

पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोने भारताविरुद्ध युद्धाची धमकी दिल्यानंतर आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी देखील पोकळ धमकी दिली आहे. पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर भारताने आक्रमक पाऊलं उचलत पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान, भारताने पाकिस्तानसाठी सिंधू जल करार स्थगित केला. यानंतर पाकिस्तानच्या सर्वच नेत्यासह मंत्र्यांचा चांगलाच जळफळाट होत असल्याचे पाहायला मिळतंय. ख्वाजा आसिफ यांनी अलिकडेच एका मुलाखतीत पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिल्याचे पाहायला मिळाले. ‘जर भारताने सिंधू नदीवर कोणतंही धरण बांधून पाकिस्तानचं पाणी अडवलं तर पाकिस्तान हल्ला करेल, असं ख्वाजा आसिफ म्हणाले.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव चांगलाच शिगेला पोहोचला असताना ख्वाजा आसिफ यांनी हे धमकी देणारं वक्तव्य केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलंच कोंडीत अडकवलं असताना आता दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध बिघडले असल्याचे दिसतंय.

Published on: May 03, 2025 04:58 PM