India-Pakistan Conflict : खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये पसरली भारताची भीती
Pakistan government panic : भारत - पाकिस्तान तणाव वाढलेला असताना पाकिस्तानी पंतप्रधानच गायब झालेले आहेत. भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानी खासदार देखील चांगलेच घाबरलेले आहेत.
भारत – पाकिस्तान तणाव वाढलेला असताना पाकिस्तानी पंतप्रधानच गायब झालेले आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ नेमके कुठे आहेत? असा प्रश्न खुद्द पाकिस्तानच्या जनतेला सुद्धा पडला आहे. पत्रकारांकडून देखील हा प्रश्न उपस्थित केला जात आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देताना पाकिस्तानी उपपंतप्रधानांची चांगलीच पंचाईत होत आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांना देखील भारताकडून होणाऱ्या हल्ल्याची भीती वाटत आहे. एलओसीवर भारत कधीही हल्ला करेल अशी भिजी ख्वाजा आसिफने व्यक्त केली आहे. भारत पाकिस्तानवर मिसाईलने हल्ला करू शकतो, या भीतीने पाकिस्तानी खासदारांची देखील आता घाबरगुंडी उडाली आहे. एका खासदाराने तर पाकिस्तान सोडून लंडनला पळून जाणार असल्याचं देखील म्हंटलं आहे.
Published on: May 06, 2025 05:06 PM
