Pakistan Spy : भारताची गुप्त माहिती पाकला पुरवली, ठाण्यातून तरूणाला अटक; आई रडून बेहाल अन् काय घडलं ते सारं सांगितलं…
ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर, भारतात राहणाऱ्या पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या लोकांचा शोध सुरू आहे. अलिकडेच, ज्योतीला हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणा येथून अटक करण्यात आली तर ठाण्यातही एका तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे.
भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आलं आहे. दहशतवादी विरोधी पथकाकडून एका तरूणाला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसने हेरगिरीच्या आरोपाखाली रवींद्र मुरलीधर वर्मा नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी रवींद्र मुरलीधर वर्मा याने हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला ही माहिती पुरवली असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले की आरोपी पाकिस्तानची गुप्तचर संस्था पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्हच्या संपर्कात होता. रवींद्र वर्मावर केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेली संवेदनशील आणि गोपनीय माहिती सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर एजंटसोबत शेअर केल्याचा आरोप आहे. या कारवाईनंतर रवींद्र वर्माच्या आईने आपली प्रतिक्रिया देताना नेमकं काय घडलं हे सारं सांगितले आहे. बघा व्हिडीओ
Published on: May 30, 2025 12:06 PM
