साडेतीन मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणीचे पहा गोजिरे रूप

| Updated on: Mar 22, 2023 | 8:45 AM

झेंडु, आष्टर, ग्लेंडर, केशरी झेंडु, गुलाब, शेवंती, ड्रेसिना, औरकेड अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास ही मंदिरात करण्यात आली आहे

Follow us on

पंढरपूर : सण व उत्सव असला म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध प्रकारची आरास, विशेष सजावट करण्यात येते. यावेळीही गुढीपाडवा निमित्त विठू-रखूमाईच्या भक्तासांठी मंदिर समितीने आकर्षक फुलांची सजावट केली आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहुर्त असल्याने पंढरपूर येथील सावळया विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेचा गाभारा, सोळखांबी, चारखांबि तसेच मंदिराच्या विविध भागाना फुलांनी जसवण्यात आले आहे.

झेंडु, आष्टर, ग्लेंडर, केशरी झेंडु, गुलाब, शेवंती, ड्रेसिना, औरकेड अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास ही मंदिरात करण्यात आली आहे. हि आरास रांझंनगाव येथील विठ्ठल भक्त नानासाहेब पाचनकर यांनी केली. यासाठी जवळपास एक टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे. तर विठुरायाचे आजचे गोजिरे रूप अधिकच खुलुन दिसत आहे .