बीडच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल काही बोलायची गरज नाही : पंकजा मुंडे

बीडच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल काही बोलायची गरज नाही : पंकजा मुंडे

| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 7:00 PM

बीडमध्ये काय अवस्था झालीय हे मी सांगायची गरज नाही. बीडच्या आमदारांनी खुद्द लक्षवेधी मांडून सांगितलं बीडचा बिहार झाला आहे, असं पकंजा मुंडे म्हणाल्या.

बीडमधील गुन्हेगारीबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, बीडमध्ये काय अवस्था झालीय हे मी सांगायची गरज नाही. बीडच्या आमदारांनी खुद्द लक्षवेधी मांडून सांगितलं बीडचा बिहार झाला आहे. पण हे मला आवडलं नाही. मी राष्ट्रीय लीडर आहे. बिहारला कमी माननं मला पटलं नाही. मी सुरूवातीपासून सांगत होते. बीडमध्ये माफीया आहे, वाळू तस्कर आहेत. प्रत्येक तक्रारीसाठी पोलीस राजकीय हस्तक्षेप घ्यायचे. आता बीडच्या एसपींना सुट्टीवर पाठवून नवीन एसपी द्यायचे ठरलं यातच सर्व आलंय, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.