Munde VS Munde | पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमध्ये वार-पलटवार

Munde VS Munde | पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमध्ये वार-पलटवार

| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 6:07 PM

पंकजा मुंडे यांनी सावरगावत भगवान गडावर धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही नाव न घेता टीका केली होती. त्यांच्या टीकेला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप नेत्या यांनी सावरगावत भगवान गडावर धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही नाव न घेता टीका केली होती. त्यांच्या टीकेला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पंकजा मुंडे या स्वत: पाच वर्ष बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. त्यामुळे मंत्रिपद भाड्याने देणं, अशा पद्धतीने आरोप करणं हा एक केविलवाणा प्रकार आहे. जनतेला माहिती आहे, दोन वर्षात एवढी संकटं असताना मंत्री म्हणून किंवा पालकमंत्री म्हणून काय काम करतोय. त्यामुळे त्यांना काय म्हणावं हे त्यांचा प्रश्न आहे, असा पलटवार धनंजय मुंडे यांनी केला.

“पंकजा मुंडे यांनी भाषणात एक गोष्ट कबूल केली, त्या मंत्रिपद भाड्याने दिलंय हे बोलल्या. पण त्या मंत्री असताना बीड जिल्ह्यातील आणि त्या सभेला उपस्थित असलेल्या असंख्य ऊसतोड मजुरांसाठी त्या मंत्री असताना न्याय देता आलं नाही. त्यावेळेस त्यांचं मंत्रिपद त्यांनी कुणाला भाड्याने दिलं होतं का?”, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला.