Dhananjay Deshmukh Video : … म्हणून पंकजा मुंडे मस्साजोगला आजपर्यंत गेल्या नाहीत, कारण आलं समोर

Dhananjay Deshmukh Video : … म्हणून पंकजा मुंडे मस्साजोगला आजपर्यंत गेल्या नाहीत, कारण आलं समोर

| Updated on: Mar 12, 2025 | 4:31 PM

12 डिसेंबर रोजी मी मस्साजोगला देशमुख कुटुंबाची भेट घेण्यास मस्साजोगला निघाले होते. अर्ध्या रस्त्यात असताना आमच्या कार्यकर्त्यांनी धनंजय देशमुखांना फोन लावला, तुम्ही आला आणि तुमच्या कोणी चुकीचं वर्तन केलं तर आम्हाला आवडणार नाही, असं धनंजय देशमुख म्हणाले

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी नव नवे खुलासे समोर येत आहे. अशातच संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून ग्रामस्थ आक्रमक आहेत. अशातच अनेक राजकीय नेते देखील मस्साजोगला जात देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन करताना दिसले. मात्र पंकजा मुंडे अद्याप मस्साजोग येथे गेले नसल्याच्या चर्चा होत असताना याचे कारण समोर आले आहे. ‘गेल्या तीन महिन्यात विविध जाती, समाजातील विविध लोकप्रतिनिधी आलेत. ते आल्यानंतर त्यांना गावकऱ्यांकडून जी वागणूक देण्यात आली त्यात गावकऱ्यांकडून तुम्ही आमचं दुखः ऐकून घ्या.. आमचं सांत्वन करा आणि आम्हाला मार्ग द्या.. पण ३१ डिसेंबर रोजी ज्यावेळी आरोपी सरेंजर झालेत तेव्हा केज न्यायालयात हजार लोकं हजर झाले होते. त्यातील काही लोकांना पंकजा मुंडे मस्साजोग येथे येणार हे कळलं त्यातील काही गुंडप्रवृत्तीचे जे लोक होते त्यांच्या डोक्यात एकच होतं की आपण काहीही करू शकतो. हे लोकं आरोपीचे समर्थक होते. पकंजा मुंडेंच्या ताफ्यावर दगडफेक वैगरे अशा घटना घडल्या असत्या आणि ती गोष्ट आमच्या गावावर आली असती’, असं धनंजय देशमुख म्हणाले. पुढे त्यांनी असंही म्हटलं की, असं काही घडलं असतं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? म्हणून आम्ही पंकजा मुंडे यांना भेटायला यायला नको म्हणलो होतो.

Published on: Mar 12, 2025 04:31 PM