VIDEO : Breaking | पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Jul 13, 2021 | 3:14 PM

खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधला

Follow us on

खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधला. त्याचदरम्याने पोलिस आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि पोलिसांनी पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे तसेच गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे देखील सांगितले जात आहे.

पंकजा मुंडे यांनी आज वरळीत पक्षव कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करतानाच दिल्लीत नेमकं काय घडलं याचीही माहिती दिली. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मी असुरक्षित नाही. मला कुणालाही संपवून राजकारण करायचं नाही. त्यामुळे मी तुमच्या सर्वांचे राजीनामे नामंजूर करत आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.