मोठी बातमी! मुंडे भाऊ-बहीण एकत्र येणार? पंकजाताई म्हणतात, होय आम्ही…

| Updated on: Aug 02, 2023 | 8:05 AM

राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले मुंडे बहीण-भाऊ आता साखर कारखान्याच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत.बीड जिल्ह्याच्या राजकारणातली मोठी बातमी समोर आली आहे.

Follow us on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. निवडणुकांमध्ये हा संघर्ष अधिक प्रकर्षाने दिसून येतो. कुठल्या कार्यक्रमाला एकत्र आले की एकामेकांना टोला लगावण्याची संधीही सोडत ते नाही. राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हे बहीण-भाऊ आता साखर कारखान्याच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत.बीड जिल्ह्याच्या राजकारणातली मोठी बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील साखर कारखाना निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले आहेत.’आम्ही एकत्रित पॅनल करण्याचा निर्णय घेतला आहे.आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी शेतकऱ्यांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत’, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे.