36 जिल्हे 50 बातम्या | अवकाळी, गारपिटीने शेतकरी त्रस्त, पहा राज्यात काय स्थिती

36 जिल्हे 50 बातम्या | अवकाळी, गारपिटीने शेतकरी त्रस्त, पहा राज्यात काय स्थिती

| Updated on: Mar 18, 2023 | 10:25 AM

नांदेडमध्येही गारपिटीमुळे 600 हेक्टरक्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात गहू हरभरा ज्वारी आणि केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी अद्याप विज पुरवठा खंडित आहे

36 जिल्हे 50 बातम्या | परभणी जिल्ह्यामध्ये गारपिटीनंतर वादळी वाऱ्यामुळे शेतीचा प्रचंड नुकसान झाले आहे. पालम तालुक्यामध्ये असलेल्या बोरगाव बुद्रुक गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे चार एकर वरील पपई पिकाचे नुकसान झाले आहे. तर नांदेडमध्येही गारपिटीमुळे 600 हेक्टरक्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात गहू हरभरा ज्वारी आणि केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी अद्याप विज पुरवठा खंडित आहे.

अकोल्याच्या पातुर तालुक्यामध्ये कोठारी गावात अवकाळी पावसासह मोठ्या गारपिटीमुळे संत्रा पिकांचा नुकसान झालं आहे. गारपीटी आणि वादळी वाऱ्यामुळे संत्रा गळून पडला. वाशिमच्या मालेगावातील पांगराबंदी मांडोली परिसरात गहू, हरभरा, कांद्याचं जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळं नुकसान झालं आहे. नंदुरबारमध्येही ठाणेपाडा परिसरात जोरदार गारपीट होत असून सलग चार दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आला आहे.

तर शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट आलं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा अशी मागणी अजित पवारांची सभागृहात केली आहे. तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, पंचनामे सुरु असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. यासह राज्यातील इतर अपडेट पहा 36 जिल्हे 50 बातम्यामधून

Published on: Mar 18, 2023 10:25 AM