Priya Fuke : परिणय फुकेंचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर; प्रिया फुकेंचं विधान भवनासमोर आंदोलन

Priya Fuke : परिणय फुकेंचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर; प्रिया फुकेंचं विधान भवनासमोर आंदोलन

| Updated on: Jul 07, 2025 | 1:53 PM

Priya Fuke Protest : मुख्यमंत्री फडणवीसांचे निकटवर्तीय भाजप आमदार परिणय फुकेंच्या कुटुंबातील अंतर्गत वाद उघड्यावर आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजप आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबातील अंतर्गत वाद आता उघड्यावर आला आहे. परिणय फुके यांच्या भावजय प्रिया फुके यांनी आज विधान भवनासमोर आंदोलन करत फुके आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले.

प्रिया फुके यांनी आपल्या मुलांसह विधान भवनावर धडक देत आंदोलन केले. यावेळी त्यांनी पर्समधून काही कागदपत्रे काढण्याचा प्रयत्न केला, परंतु महिला पोलिसांनी त्यांना अडवले. माध्यमांशी बोलताना प्रिया फुके यांनी न्यायाची मागणी केली. त्या म्हणाल्या, मी गेल्या एक वर्षापासून मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागत आहे, पण मला भेटण्याची संधी दिली जात नाही. मला न्याय हवा आहे. परिणय फुके यांच्यासारख्या व्यक्तीला का पाठिशी घातले जात आहे, हे मला कळत नाही. यानंतर पोलिसांनी प्रिया फुके यांना ताब्यात घेतले आहे.

Published on: Jul 07, 2025 01:53 PM