भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशाची आस
गोंदिया जिल्ह्यातील पवन मेश्राम नावाच्या युक्रेनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा मोठा फटका बसला आहे. तो गेल्या दोन वर्षापासून युक्रेनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेत आहे. सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुले तो भारतात येण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र सध्या तरी त्या आशा मावळल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील पवन मेश्राम नावाच्या युक्रेनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा मोठा फटका बसला आहे. तो गेल्या दोन वर्षापासून युक्रेनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेत आहे. सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुले तो भारतात येण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र सध्या तरी त्या आशा मावळल्या आहेत. युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांनी मायदेशी येण्यासाठी आठ आठ तास पायपीठ केली आहे. सध्या ते युक्रेनच्या बाहेर आले असून त्यांच्यासाठी भारत सरकारकडून शेल्टर उभा करण्यात आले आहेत. त्यामध्ये हे विद्यार्थी आसरा घेत आहेत. याबाबतचा त्यांनी स्वतः व्हिडिओ करुन पाठवला आहे. ते म्हणताहेत की, सध्या विमानसेवा सुरु झाल्याशिवाय मायदेशी परतणे शक्य नाही. त्यामुळे युक्रेनच्या धोकादायक सीमेपलिकडे येऊन ते थांबले आहेत.
Published on: Feb 28, 2022 10:49 PM
